संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

युक्रेनच्या दक्षिण भागातील युद्ध धोकादायक वळणावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

खारकीर- युक्रेनच्या दक्षिण भागातील युद्ध धोकादायक वळणावर पोहोचले असून रशिया या भागात सातत्याने हवाई करून युक्रेनला मागे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियावर युक्रेनचे बाखमूत शहर हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून भस्मसात केल्याचा आरोप केला आहे.

युक्रेनमधील डोनेटस्क, लुहान्स्क प्रांतांतील स्थितीत अत्यंत गंभीर होत आहे. झेलेन्स्कींनी सांगितले की, बाखमूत, सोलेडार, मारयिंका व क्रेमिन्ना शहरात अशी एकही जागा उरली नाही, जिथे रशियाचा हल्ला झाला नाही. रशिया रात्री उशिरा इराण बनावटीच्या कामिकाजे ड्रोनच्या मदतीने युक्रेनवर हल्ले करत आहे. यामुळे ओडेसातील जवळपास 15 लाख लोकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. ओडेसासह युक्रेनच्या खार्किव्ह, सुमी, डनिप्रोपेट्रोव्हेस्क, झापोरिझिया व खरसोनमधील हवाई हल्ल्यांतही वाढ झाली आहे. शुक्रवार व शनिवार या सलग 2 दिवसांत रशियाने जवळपास 20 हवाई हल्ले व 60 रॉकेट्स डागले. त्यात 2 जण ठार, 8 जण जखमी झाले. रशियावर रुग्णालय, दुकाने व सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर हल्ले केल्याचाही आरोप होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami