संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

यात्रेतील १२ गाड्या ओढताना
चाक अंगावरुन गेल्याने एकाचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव – एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज यांची यात्रा भरते. या यात्रेत १२ गाड्या ओढत असताना अचानक चाक अंगावरून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी घडली.
तळई गावात गेल्या अनेक वर्षापासून बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे. काल बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ध्वज काठीची धनगर मढी पासून विधिवत पूजा करून भगत समाधान भगवान पाटील यांचे सह इतर नागरिकांनी बारा गाड्या ओढण्यास सुरुवात केली. बारा गाड्यांच्या साईडला असलेल्या चाकांकडून इतर युवक व नागरिक हे या बारा गाड्यांना पुढे ढकलत होते. दुर्दैवाने बारागाड्या ओढाताना बैलगाडीचे चाक अंगावरुन गेल्याने राहुल पंडित पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे.सदर घटनेमुळे यात्रा महोत्सवावर शोककळा पसरली आहे. बारागाड्या ओढताना गर्दीमुळे तरुण गाड्याखाली ढकलला गेला व त्याच्या पोटावरून बैलगाडीचे चाक गेल्याने गंभीर अवस्थेत तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मृत राहुल हा एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जळगाव जिल्हा बॅंकेत लिपिक म्हणून काम करत होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami