संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

यवतमाळमध्ये एकाच दिवशी
2 शेतकर्‍यांची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

यवतमाळ – राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळच्या मारेगाव आणि उमरखेड येथील दोन शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथील पंढरी गोविंदा नैताम (52) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. नैताम यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे केवळ दोन एकर शेती असून, यात कपाशीची लागवड केली होती. यावर्षी अतिवृष्टीमुळे पीक मातीमोल झाले असून, खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी विषप्राशन करून जीवन संपवले तर दुसर्‍या घटनेत उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील युवा शेतकरी शंकर नामदेव आखरे (36) यांनी गोठ्यात गळफास घेत आत्महत्या केली. ते निंगनुर येथे आपल्या शेतामध्ये कुटुंबासह राहण्यास होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami