संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

यंदाच्या ‘नोबेल ” शांतता पुरस्कारासाठी अल्ट न्यूजच्या मोहम्मद जुबेरना नामांकन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

९२ संस्था, २५१व्यक्तींसह ३४३ जणांचा समावेश

स्टॉकहोम – नोबेल शांतता पुरस्कार २०२२ चे नुकतेच नामांकन जारी करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या विजेत्यांची घोषणा ओस्लो येथे उद्या ७ ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी १ वाजता केली जाणार आहे.तरी प्रतिष्ठीत अशा या पुरस्कार सोहळ्यात दोन भारतीयांना नामांकन मिळाले आहे. देशातील फॅक्ट चेक वेबसाईट असलेल्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर आणि प्रतीक सिन्हा यांची शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.भारतात मात्र मोहम्मद जुबेर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी खटला सुरु आहे.त्यामुळे मोहम्मद जुबेर यांना हा पुरस्कार मिळेल का हे पहावे लागेल.

गेल्या जून महिन्यात अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या आयएफएससी युनिटने अटक केली होती.त्यांच्या अटकेनंतर जगभरात संतापाची लाट उसळली होती.अमेरिकन नॉन-प्रॉफिट कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टने भारतातील प्रेस स्वातंत्र्यासाठी आणखी पातळी घसरली.जिथे सरकारने प्रेस रिपोर्टिंग सदस्यांसाठी सांप्रदायिक मुद्द्यांवर प्रतिकूल आणि असुरक्षित वातावरण निर्माण केले.गेल्या महिन्यात जुबेर यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर त्यांची तिहार जेलमधून सुटका झाली होती.

दरम्यान, यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३४३ जणांमध्ये २५१ वैयक्तिक आणि ९२ संस्थांचा समावेश आहे.प्रतीक सिन्हा व झुबेर यांच्या व्यतिरिक्त,युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की,यूएन निर्वासित एजन्सी, जागतिक आरोग्य संघटना आणि व्लादिमीर पुतिन टीकाकार अलेक्सी नवलनी हे देखील शांतता पुरस्काराचे दावेदार आहेत. नोबेल समितीकडून अजून नोबेल शांतता पुरस्कारासाठी नावाची घोषणा केलेली नाही.याबाबत माध्यमे किंवा सदस्यांनाही याबाबत माहिती दिलेली नाही. रॉयटर्सच्या सर्वेक्षणामध्ये बेलारूसमधील विरोधी राजकारणी स्वीयातलाना सिखानौस्काया, ब्राॅडकास्टर डेव्हिड अ‍ॅटनबरो, हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग,पोप फ्रान्सिस,तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे आणि म्यानमारचे राष्ट्रीय एकता सरकार हे नॉर्वेजियन खासदारांनी नामांकनामध्ये समावेश केलेल्यांमध्ये असल्याचे आढळले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami