संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

म्हाडाच्या ५९१५ घरांसाठीच्या सोडतीचा निकाल लांबणीवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जानेवारी महिन्यात ५,९१५ सदनिकांसाठी सोडत काढली होती. मात्र, प्रणालीमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे या सोडतीचा निकाल आणखी आठ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. हा निकाल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच जाहीर होणार असल्याचे म्हाडाने सांगितले.

म्हाडा पुणे मंडळाकडून यंदा प्रथमच इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएचएलएमएस) २.० या नूतन प्रणालीद्वारे सोडत काढण्यात आली. त्यासाठी अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. या सोडतीसाठी ३१,६०० अर्जदारांनी घरासाठी आवश्यक कागदपत्रे दिली. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर संबंधितांनी पैसे भरले. त्यानुसार सोडतीचा निकाल ७ मार्च रोजी जाहीर होणार होता. मात्र, संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे तो रद्द कऱण्यात आला. दरम्यान, हा निकाल जाहीर करण्यास आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या