संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

म्यानमारमध्ये अडकलेल्या ४५ भारतीयांची अखेर सुटका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – नोकरीच्या अमिषाने गेलेल्या आणि म्यानमारमध्ये अडकलेल्या ४५ भारतीय तरुणांची अखेर सुटका केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारतीयांची अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या म्यानमारमधील रॅकेटचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
थायलंडमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने १०० पेक्षा अधिक भारतीयांना फसवून म्यानमारला नेले. तेथे सायबर फसवणुकीच्या कंपनीत त्यांना नोकरीला लावले. परंतु त्या देशात बेकायदा प्रवेश केल्यामुळे त्यांना अटक झाली. तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने त्यांची सुटका केली. यापूर्वी ३२ जणांची सुटका केली होती. त्यानंतर आता १३ जणांची सुटका केल्याने आत्तापर्यंत फसवणूक झालेल्या व म्यानमारमध्ये अडकलेल्या ४५ जणांची सुटका झाली आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami