संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मोेदींच्या दौर्‍याच्या दिवशीच कानपूरमध्ये दोन गटांत हिंसाचार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कानपूर – भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहंमद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कानपूर दौर्‍याच्या दिवशीच दोन गटांत राडा झाला आणि कानपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न एकदा ऐरणीवर आला आहे.

आज राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे कानपूरच्या दौर्‍यावर होते. मात्र त्यांच्या कानपूर दौर्‍याच्या काही तास अगोदर जुम्म्याच्या नमाजनंतर दोन गटांत तुफान दगडफेक झाली. त्यामुळे मोठी खळबळ माजली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवले. मात्र या घटनेमुळे तणाव वाढला आहे. 27 मे रोजी एका कार्यक्रमात भाजप नेत्या नुपर शर्मा यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ जोव्हर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लीम संघटनांनी मुस्लीम समाजाला आपले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार चमनगंज, बंगन गंज, तलाक महल, कर्नल गंज, हिरामन पूर्वा, दलेल पूर्वा, मेस्टन रोड आदी भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दुपारच्या नमाज पठणानंतर अचानक मोठा जमाव एकत्र जमला आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याच्या विरोधात दुसर्‍या समाजाने एकत्र येऊन घोषणाबाजी केली आणि त्यानंतर दगडफेक सुरू झाली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि दोन्हीकडच्या काही लोकांना ताब्यात घेतल आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami