तिरुअंनतपुरम – लक्षद्वीपमधील राष्ट्रवादीचे माजी खासदार मोहम्मद फैजलला हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आज केरळ हायकोर्टाने याप्रकरणी मोहम्मद फैजलांच्या 10 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला.
मोहम्मद फैजलसह काही लोकांनी वादानंतर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई मोहम्मद सलियांना गंभीर मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी फैजल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद सलियांना नंतर केरळला नेण्यात आले. त्यांच्यावर अनेक महिने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या खटल्यात एकूण 32 आरोपी होते आणि पहिल्या चार जणांना शिक्षा झाली होती. मोहम्मद फैजल हे या प्रकरणातील दुसरे आरोपी होते.