मुंबई : २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रीची नावे जोडली गेली असताना अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत असतानां, अलीकडेच नोरा फतेहीने सुकेशवर आरोप केला होता की, त्याने तिला आपली गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. आता नोरा फतेहीच्या या वक्तव्यावर सुकेशने सांगितले की, नोराने घर घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे मागितले होते. तसेच त्याने जॅकलिन फर्नांडिसला सोडावे अशी तिची इच्छा होती यासाठी नोरा त्याला त्रास देत असल्याचे सुकेशने नोरावर गंभीर आरोप केले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, २००कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरने मीडियाला दिलेल्या निवेदनात नोरा फतेहीवर हे गंभीर आरोप केले आहेत. मोरोक्कोमध्ये घरासाठी नोराला पैसे दिल्याचे सुकेशने म्हटले आहे. यासोबतच सुकेशने असेही सांगितले की, नोराने नेहमीच आपल्याला जॅकलिनला सोडून देण्यासाठी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. मोरोक्कोमधील कासाब्लांका येथे तिच्या कुटुंबासाठी घर घेण्यासाठी तिने माझ्याकडून खूप मोठी रक्कम आधीच घेतली असल्याचे आरोप सुकेशने नोरावर केले आहेत. मात्र कायद्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने सर्व नवीन कथा रचुन स्वतःला वाचवण्याचा ती प्रयत्न करत असल्याचेही सांगत नोराने तिला कार नको होती, हा जो दावा केला आहे तो खोटा असल्याचे स्पष्ट करत, तिने माझ्यामागे कार बदलण्यासाठी तगादा लावला होता. म्ह्णून मी तिला बीएमडब्ल्यू एस सीरीज दिली जी तिने ती भारताबाहेरची असल्यामुळे तिच्या जिवलग मैत्रिणीचा नवरा बॉबीच्या नावावर गाडीची नोंदणी करण्यास सांगितले होते असे सुकेशने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आता ती स्वतःला वाचवण्यासाठी काहीही सांगत असल्याचे सुकेशने निवेदनाद्वारे म्हणत नोरावर हे गंभीर आरोप केले आहे.