संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारे गुजरातचे आप प्रमुखांना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली:- गुजरात आपचे अध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी मोदींसाठी अपशब्द वापरले आहेत. भाजपाने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.इटालियाला राष्ट्रीय महिला आयोगाने पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त भाषणासाठी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. भाजप नेते संबित पात्रा यांनीही पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात मोठे प्रश्न उपस्थित केले होते.

या संपूर्ण प्रकरणाची सुरूवात एका व्हायरल व्हिडिओने झाली ज्यामध्ये इटालिया पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद शब्द वापरताना दिसत आहे. खुद्द इटालिया आणि आप नेत्यांनी कबूल केले की हा व्हिडिओ इटालियाचाच आहे, पण तो जुना आहे. इटालियाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो महिलांना मंदिर आणि कथेत न जाण्याचे आवाहन करत आहे. ते म्हणतात की मंदिरे आणि कथा शोषणाच्या अड्डे आहेत.या व्हिडिओ नंतर गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या अटकेनंतर आम आदमी पक्षाने भाजपवर टीक केली आहे. आपने ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने गोपाळ इटालिया यांना अटक केली होती. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विटमधून इटालिया यांची अटक हा गुजरातमधील सर्व पटेल कुटूंबाचा अपमान केला आहे. त्यामुळे पटेल समाजात धुसफुस आहे. संपुर्ण भाजप इटालिया यांच्या मागे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami