संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

मेस्सीचा फुटबॉल विश्वाला अलविदा कतारमध्ये शेवटचा “फिफा’ खेळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ब्यूनस आयर्स – फुटबॉल विश्वावर १७ वर्षे अधिराज्य गाजवणारा दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीने निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ३५ व्या वर्षीही आपण तंदुरुस्त आहोत. ही आनंदाची बाब आहे. मात्र कतारमध्ये होणारा आपल्या कारकिर्दीतला ५ वा आणि शेवटचा फिफा वर्ल्डकप असेल, असे त्याने सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मेस्सीने ९० गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात क्रिस्टियानो रोनाल्डोचा ११७ गोलचा जागतिक विक्रम आहे. त्यानंतर मेस्सीचा फुटबॉल विश्वात दबदबा आहे.
अर्जेंटिना फुटबॉल संघातून मेस्सी आतापर्यंत ४ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खेळला आहे. २००५ मध्ये त्याने फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात केली. तो १६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. अर्जेंटिनाच्या सीनियर संघाकडून त्याने ९० गोल केले आहेत. कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्डकपसाठी मी उत्सुक आहे. तो माझ्या कारकिर्दीतला अखेरचा विश्व चषक असेल. त्यात चांगली कामगिरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. फुटबॉल विश्वात मेस्सीच्या नावाचा दबदबा असला तरी देशासाठी त्यांनी एकदाही वर्ल्डकप जिंकून दिलेला नाही. गेल्या वर्षी कोपा अमेरिका स्पर्धा अर्जेंटिनाने जिंकली होती. २०१४ मध्ये मेस्सीने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र त्यांना वर्ल्ड कप जिंकता आला नाही. मेस्सीला ४ वेळा “मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami