मुंबई – आरे कारशेड आंदोलक फालतू आणि बोगस आहे. असे अभिनेता सुमित राघवनने वादग्रस्त ट्वीट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याने एक व्हिडीओ रिट्वीट केला आहे. मेट्रो कारशेडला पाठिंबा देणाच्या या ट्वीटमुळे सुमित राघवन प्रचंड ट्रोल होत आहे.
त्याने एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. फ्रेंचचे नागरिक क्लायमेट चेंज ॲक्टविस्ट लोकांची काळजी घेताना अशी कॅप्शन दिली होती. व्हिडिओत एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. सुमीतने व्हिडिओ रिट्विट करत लिहिले की, आरेच्या आंदोलकांबरोबर आपणही हेच करायला हवे होते. डोक्यावर चढले होते, बोगस फालतू लोक. काही कामाचे ना धामाचे, झोलछाप. असे लिहित त्याने आरे आंदोलकांची टिंगल उडवली.
सुमीतने केलेल्या या ट्वीटमुळे नेटकरी प्रचंड संतापले.अनेकांनी सुमीतच्या या ट्वीटला उत्तर देताना त्याला खडेबोल सुनावले. तर काही युझरनी तर तो माणूस म्हणून अत्यंत वाईट असल्याचे म्हणत त्याच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, राघवन साहेब अती होतेय बरे, तसेच तर आणखी एका युझरने सुमीतच्या हेतूबद्दल शंका व्यक्त केली. तसंच त्याचे हे वागणे पुरस्कारासाठी असल्याचे म्हटले.