संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मेटा कंपनीचा महसूल घसरला! गुंतवणूकदारांना मोठा फटका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला जवळ आणणाऱ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या तिसऱ्या तिमाहीतील महसुलात चार टक्क्यांनी घसरण झाली आहे. मेटाचा महसूल 29 बिलियन डॉलरवरून 27.7 बिलियन डॉलरवर आला आहे. याची घोषणा करतानाचा कंपनीने महत्वाचे बदल केले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

वर्षभरापूर्वी मार्क झुकेरबर्ग यांनी आभासी जगाला चालना मिळण्यासाठी कंपनीचे नाव फेसबुकवरून मेटा करण्याची घोषणा केली. महामारीच्या काळात जाहिरात व्यवसायातील तेजीमुळे सोशल मीडिया नेटवर्कचे बाजारमूल्य सुमारे ९० लाख कोटी रुपयांवर गेले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी नव्या प्रयोगात रस घेतला. मात्र वर्षभरानंतर परिस्थिती वेगळी दिसते.री-ब्रँडिंगनंतर कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाली आहे.महसूल कमी होत आहे आणि नफाही कमी होत आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला कोणताही लक्षणीय महसूल मिळवता आला नव्हता.दिवसेंदिवस मेटा कंपनीचे प्रदर्शन खराब होऊ लागले असून गुंतवणूकदारांना फटका बसला आहे.. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फेसबुकवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या दोन टक्क्यांनी वाढून 2.96 अब्ज झाली आहे. तसेच कंपनीतील कर्मचार्‍यांची संख्या 87,314 पर्यंत वाढली आहे. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा २८ टक्क्यांनी जास्त आहे. जास्त कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आम्ही संपूर्ण बोर्डमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहोत, असे मेटाने म्हटले आहे. कमाईतील ही घसरण मुख्यतः मेटाच्या मेटाव्हर्समध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे आहे. मेटाच्या आभासी वास्तविकता विभाग, रिअॅलिटी लॅबला या तिमाहीत $3.672 अब्जांचे नुकसान झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami