संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

मेटा, एमेझॉन, ट्विटरनंतर सिस्को
४१०० कर्मचाऱ्यांची कपात करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : करोनाच्या संक्रमणापासून जगभर खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार कायम असल्याचे पहायला मिळत असताना, गेल्या काही दिवसांमध्ये खासगी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात होत आहे. मेटा, अ‍ॅमेझॉन, ट्विटरनंतर आता सिस्कोनेही आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेटा, ऍमेझॉन, ट्विटरनंतर आता आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर मंदीचे सावट दिसत असताना, आता सिस्को या आयटी कंपनीतही नोकर कपात करण्यात येणार आहे. सिस्कोमधून पाच टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार आता जाणार आहे. जगभरात सिस्कोचे ८३,००० हजार कर्मचारी आहेत. ‘राईट टू बिझनेस रिबॅलेंसिंग’ करण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येत असल्याची माहिती अमोर आली असून, सिस्कोमध्ये जवळपास ४१०० कर्मचारी कपात होणार आहे. याबाबत कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांनी कंपनीतील नोकरकपातीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नसली तरी, जोपर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांशी याबाबत अधिक सविस्तरपणे संवाद साधत नाही. तोपर्यंत आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही. मात्र आम्ही व्यवसायात संतुलन आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर काही क्षेत्रांमध्ये आम्हाला अधिक गुंतवणूक करायची आहे. सिक्युरिटी, क्लाउड डिलिव्हरर्ड प्रोडक्ट अशा उत्पादनांकडे लक्ष देत असल्याने आम्ही काही प्राधान्यक्रम निश्चित करत असल्याची माहिती सिस्कोचे मुख्य आर्थिक अधिकारी स्कॉट हेरेन यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही ज्या नवीन क्षेत्रात गुंतवणूक करत आहोत, त्या क्षेत्रात रोजगाराची संख्या वाढवावी लागणार आहे. त्यामुळे आमच्या कर्मचार्‍यांना त्या रोजगाराशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी थोडे परिश्रम घ्यावे लागणार असून, तिथे काही कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा कस लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami