नवी दिल्ली – फेसबुकची मूळ कंपनी मेटाने संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही घोषणा कंपनीने आज केली. पुढील वर्षी १ जानेवारी २०२३ पासून त्या ही नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत. दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची पालक कंपनी मेटा इंडियाच्या उपाध्यक्षपदी संध्या देवनाथन यांची नियुक्ती झाली आहे. तशी घोषणा कंपनीने आज केली. अजित मोहन यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. मोहन यांनी २ आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला आहे. ते प्रतिस्पर्धी कंपनी स्नॅपची जबाबदारी स्वीकारणार आहेत. देवनाथन नवीन वर्षात नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत.