मुंबई – सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी चार वर्षांच्या दीर्घ कार्यकाळानंतर आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.मेटा इंडियाने गुरुवारी ही माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार अजित मोहन यांनी चांगल्या संधीच्या शोधात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो येत्या काही दिवसांत मेटाचा प्रतिस्पर्धी स्नॅप इंडियामध्ये सामील होऊ शकतात.मेटा कंपनीच्या प्रवक्त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की,मेटा इंडियाचे डायरेक्टर मनीष चोपडा त्यांच्या जागी कंपनीचा अंतरिम कार्यभार स्वीकारतील.मोहन आशिया-पॅसिफिकचे प्रमुख म्हणून काम पाहतील. मेटामधील ग्लोबल बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेलसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या चार वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात,अजित मोहन यांनी भारतातील कंपनीचे कामकाज आणि विस्तार वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्ही भारतासाठी वचनबद्ध आहोत आणि आमच्याकडे सर्व काम पुढे नेण्यासाठी एक मजबूत नेतृत्व आणि टीम आहे.
दरम्यान, अजित मोहन स्नॅप येथे आशिया-पॅसिफिक विभागाचे डायरेक्टर म्हणून पदभार स्वीकारतील. मोहन यांनी जानेवारी २०१९ मध्ये मेटामध्ये प्रवेश केला, ज्याला फेसबुक म्हणून ओळखले जात होते. अजित मोहन यांच्या कार्यकाळात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप एकूण २०० मिलियन यूजर्सशी जोडले गेले. त्यांच्या कार्यकाळातच जिओ ने मेटासोबत ५.७ अब्ज डॉलर करारावर स्वाक्षरी केली,ज्यामध्ये व्हॉटसअपच्या व्यावसायिक सुविधांचा विस्तार करणे समाविष्ट आहे.