वॉशिंग्टन- फेसबुकची मुळ कंपनी असलेल्या मेटाने जगभरातील 11 हजार कर्मचार्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरनंतर मेटाने कर्मचारी कपात केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. झुकरबर्ग म्हणाले की, मेटाच्या इतिहासातील हा सर्वात कठीण बदलाची मी आज घोषणा करत आहे. मी 13 टक्के म्हणजेच 11 हजार इतक्या बुध्दीमान कर्मचार्यांना जाऊ देत आहे.