संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

मेघालय, नागालँड विधानसभा निवडणूक प्रचार संपला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिलॉन्ग :- मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांमध्ये सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जवळपास संपुष्टात आली. या दोन्ही राज्यातील प्रचाराच्या तोफा आज दुपारी चार नंतर थंडावल्या. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दोन्ही राज्यांत प्रचार रॅली घेतली. ‘आम्ही प्रदेश आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही’, असे म्हणत प्रचारादरम्यान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

याआधी भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी राज्यांचा दौरा करून भाजपचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला. सध्या मेघालयमध्ये कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखाली नेशनल पीपल्स पार्टी, भाजप आणि इतर प्रादेशिक पक्षांचे युतीचे सरकार आहे. मेघालयमध्ये पूर्वी काँग्रेसची ताकद होती, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली. यावेळी भाजपने मेघालयातील सर्वच ६० विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. नागालँडमध्ये मुख्यमंत्री नेफियू रिओ यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत युतीचे सरकार सुरु आहे. २०१८ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप यांच्यात ४०:२० असा जागा वाटपाचा फॉर्म्युल्या ठरला होता. हा फॉर्म्युल्या पुढेही कायम ठेवण्यात आला. या दोन्ही राज्यांतील मतमोजणी २ मार्चला होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या