मेक्सिको सिटी- मेक्सिको सिटीतील भव्य अशा मुख्य प्लाझामध्ये काल रविवारी हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार मोर्चा काढला.वमेक्सिकन सरकारने निवडणूक नियमांत केलेल्या बदलाला या नागरिकांचा विरोध आहे. या बदलामुळे देशातील लोकशाही धोका निर्माण होऊ शकतो असे या आंदोलकांचे म्हणणे आहे या मोर्चेकऱ्यांनी पांढरे आणि गुलाबी कपडे परिधान केले होते.यावेळी सर्वजण ‘माझ्या मताला हात लावू नका’ अशा घोषणा देत होते.
मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्रादोर यांनी प्रस्तावित सुधारणा विधेयक पारित केले होते. त्यामध्ये वेतनात कपात, स्थानिक निवडणूक कार्यालयासाठी निधी आणि मतदान केंद्रातील कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचा समावेश आहे. मेक्सिकोतील निवडणूक प्रक्रिया अन्य देशांपेक्षा मोठी खर्चिक असते.कारण निवडणूक आयोगासह सर्व खर्च सरकार करत असते.