संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 26 September 2022

मेक्सिकोत बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, १० जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : मेक्सिकोमध्ये गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी बंदूकधारी व्यक्तीने सेंट्रल मेक्सिकोमधील एका बारमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मे महिन्यातही अशीच घटना घडली होती. मेक्सिकोच्या मध्य शहरातील हॉटेल आणि दोन बारमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात १० लोकांनी जीव गमावला होता.
स्टेट एटर्नी जनरल ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल मेक्सिकोमध्ये मार्च महिन्यात १९ लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अनेकजण जखमी होते, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर जानेवारी महिन्यात एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली होती. चार महिन्यातील ही पाचवी घटना होती. डिसेंबर २००६ मध्ये सरकारने वादग्रस्त लष्करी अंमली पदार्थविरोधी ऑपरेशन सुरू केल्यापासून मेक्सिकोमध्ये तीन लाखांहून अधिक हत्या झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami