संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मूसेवालाच्या मारेकऱ्याला लोकांनीच बदडले! दीपकला नेपाळमध्ये अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कांठमांडू – पंजाबी गायक मूसेवाला हत्याकांडातील शेवटचा आरोपी दीपक मुंडी याला नेपाळ पोलिसांनी शनिवारी अटक केली. विशेष म्हणजे चोर समजून नागरिकांनी दीपक आणि त्याच्या दोन साथीदारांना बेदम चोपले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर दीपक मूससेवाला हत्याकांडातील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दीपक आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. त्याला भारतात आणण्यासाठी दिल्ली व पंजाब पोलिसांचे पथक नेपाळला गेले आहे.

मूसेवाला हत्याकांडातील दीपक मुंडी कपिल पंडित आणि राजेंद्र या दोन साथीदारांसह पश्चिम बंगाल-नेपाळ सीमेवरील झापा गावात गेला होता. तेव्हा भुरटे चोर समजून तेथील नागरिकांनी या तिघांना चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दीपक मुंडी मूसेवाला हत्याकांडातील आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर नेपाळ पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणी भारतीय पोलिसांनी नेपाळ पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यांनी अटक केलेल्या दीपकला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. दिल्ली आणि पंजाब पोलिसांचे पथक कागदपत्रे घेऊन नेपाळला रवाना झाले आहे. त्यानंतर या तिघांना दिल्लीत आणले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. मूसेवालाची २९ मे रोजी हत्या झाली. तेव्हापासून दीपक फरार होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami