संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

मुसेवाला हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – प्रसिद्ध पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हत्याकांडात सामील असलेला शार्प शूटर अंकित सेरसा तसेच त्याच्या सचिन नावाच्या साथीदाराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. काश्मिरी गेट परिसरात काल मध्यरात्री पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

अंकित सेरसा हा हत्याकांडातील प्रियव्रत उर्फ फौजी मॉड्युलचा सदस्य आहे. तो मुळचा हरियाणातील सेरसा गावचा रहिवासी असून लॉरेन्स बिष्णोई-गोल्डी बराड टोळीशी संबंधित आहे. अंकित विरोधात राजस्थानमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे याआधीच दाखल आहेत. अंकित व सचिन यांच्याकडे पंजाब पोलिसांचे तीन ड्रेस, 9 एमएमचे एक पिस्तुल, पॉर्ईंट तीन एमएमचे एक पिस्तुल, मोबाईल, डोेंगल आदी ऐवज सापडला असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेकडून सांगण्यात आले. मुसेवाला हत्याकांडातील मुख्य शूटर प्रियव्रत याच्यासोबत अंकित सेरसा बोलेरोमध्ये बसला होता. पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला याची हत्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके नावाच्या गावात झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami