संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मुसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकाचा ऑस्ट्रेलियात अपघाती मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मेलबर्न- पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्यानंतर आता आणखी एका पंजाबी गायकाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील लोकप्रिय गायक निरवैर सिंग यांना ऑस्ट्रेलियात झालेल्या भीषण कार अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.ऑस्ट्रेलियाच्या मीडिया रिपोर्टनुसार, पंजाबी गायक निरवैर सिंग याचा मेलबर्गजवळ बुल्ला-डिगर्स रेस्ट रोडवर ३० ऑगस्ट रोजी हा भीषण अपघात झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन मुलांचे वडील निरवैर सेडान हे कारमधून बाहेर काही कामानिमित्त जात असताना मेलबर्नजवळ त्यांच्या कारला अचानक अपघात झाला.ही घटना बुल्ला-खणकर रेस्ट रोडवर डिगर्स रेस्टमध्ये घडली.या संपूर्ण प्रकरणात २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.निरवैर ज्या कारमधून प्रवास करत होता ती कार एका जीपला धडकली. या अपघातात एक महिलाही जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याने आणि तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला.सिंग हे काही वर्षांपूर्वी आपले करियर बनविण्यासाठी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते.त्यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत.त्याच्या ‘माय टर्न’ अल्बममधील ‘तेरे बिन’ हे गाणे खूप गाजले होते. निरवैर हा पंजाबमधील कुरळी येथील रहिवासी होता.त्याचे लग्नही तो ऑस्ट्रेलियाला रहायला गेल्यानंतर झाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami