संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मुसेवालाची हत्या करणारा टिनू पंजाब पोलिसांच्या ताब्यातून फरार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदीगड- पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला गोळ्या घालून हत्या करणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर दीपक कुमार उर्फ टिनू पंजाब पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. या घटनेनंतर पंजाब पोलिसांनी राजस्थान आणि हरियाणाशी जोडलेली सीमा सील केल्या. यामुळे पंजाब पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

आज सकाळी दीपक टिनूला सीआयएच्या पथकाद्वारे कपूरथळा कारागृहातून एका खासगी वाहनातून चौकशीसाठी मानसा येथे आणले जात होते. सिद्धू मूसवाला खून प्रकरणाशी संबधीत त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार होती. मात्र, दीपक टिनू अचानक सीआयएच्या पथकाला चकवा देत फरार झाला. टिनू हा हरियाणातील भिवानी येथील रहिवासी आहे. टिनूचे वडील चित्रकार असून त्याच्यावर हरियाणा, पंजाब, चंदीगड, राजस्थान, दिल्ली येथे खून, खुनाचा प्रयत्न असे 35 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो 2017 पासून तुरुंगात असून तो गेल्या 11 वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. त्याने भिवानीमध्ये बंटी मास्टरची हत्या केली, तर पंजाबमध्ये त्याने गुंड लवी देवडाला गोळ्या घालून ठार केले. दीपकपाठोपाठ त्याचा लहान भाऊ चिरागही ड्रग्ज तस्करी आणि कार स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अडकला आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami