संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मुलायम सिंह यादव यांचे निधन! उद्या दुपारी सैफई येथे अंत्यसंस्कार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ- समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांनी गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 8.16 वाजता अखेरचा श्वास घेतला. 82 वर्षीय मुलायम यांना 26 सप्टेंबरपासून युरिन इन्फेक्शनमुळे मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.मुलायम सिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांचे पार्थिव सैफई येथे नेण्यात आले असून उद्या दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.
मुलायम सिंग यादव 22 ऑगस्टपासून ते मेदांता रुग्णालयात दाखल होते. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मुलायम यांना २ ऑक्टोबरला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यांना युरिन इन्फेक्शनसह रक्तदाबाचा त्रास वाढला होता. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. मुलायम सिंह यादव यांनी आज अखेरचा श्वास घेतला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली आणि अखिलेश यादव यांचे सांत्वन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी यांनी म्हटले आहे की, त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचो.मुलायमजींच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या लाखो समर्थकांप्रती माझ्या संवेदना आहेत, ओम शांती. पंतप्रधान मोदी गुजरातमधील भरूचमध्ये एका जाहीर सभेला आज संबोधित करत होते. इथेही त्यांनी मुलायमसिंह यादव यांची आठवण काढली. मोदी म्हणाले की, मुलायमजींचे जाणे देशाचे मोठे नुकसान आहे. मुलायमजींशी माझे विशेष नाते होते.आम्ही दोघेही मुख्यमंत्री म्हणून भेटायचो. मला आणि त्यांनाही एकमेकांबद्दल आपुलकीची भावना वाटत होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami