संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

मुलांच्या टिफिनमधून ड्रोनने पाठवला बॉम्ब

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जम्मू – मुलांच्या टिफिन बॉक्समधून भारतीय सीमेवर आयईडी बॉम्ब पाठवल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. मात्र भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हा मोठा कट हाणून पाडला. संशयास्पद ड्रोन पाहून सुरक्षा दलांनी त्यात लटकलेल्या वस्तू काळजीपूर्वक खाली काढल्या. त्यानंतर तो आयईडी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. हा बॉम्ब टायमर लावून पाठवण्यात आला होता. तो निकामी करण्यात आला असून संशयितांवर गुन्हा दाखल झाला आला. याबाबत पाकिस्तानकडून मोठा कट रचण्याची योजना असल्याची भीती सुरक्षा दलांना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये काल रात्री बीएसएफने कनाचक परिसरात ड्रोनची हालचाल पाहिली आणि ड्रोनवर गोळीबार केला. ड्रोनला जोडलेले पेलोड खाली आणण्यासाठी ताबडतोब एक पोलीस पथक तैनात करण्यात आले. पेलोडमध्ये मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक केलेले 3 चुंबकीय आयईडी होते, ज्यात वेगवेगळ्या वेळेसाठी टायमर सेट केला होता. दरम्यान, रात्रीच्या अंधारात हे बॉम्ब कुठे फेकले जाणार होते, याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami