मुरबाड- मुरबाड पंचायत समितीची आमसभा होउन जवळपास 15 वर्ष लोटले आहे. गेल्या 15 वर्षात मुरबाड पंचायत समितीने आमसभेला बगल दिल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे.
विद्यमान आमदारांचा आमसभे साठी वेळ मिळवण्यात गेल्या 15 वर्षा पासून अपयश आल्याने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत व त्यांचे समाधान होणारी आमसभा आज ही प्रतिक्षेत आहे .मुरबाड पंचायत समिती मध्ये 15 वर्षात अनेक सभापती व अनेक गटविकास अधिकारी बदलले त्यापैकी गटविकास अधिकारी हाश्मी यांनी आमसभा घेण्याचा प्रयत्न केला मात्र या आमसभे साठी विद्यमान आमदारांनी वेळ न दिल्याने तिलाही मुहर्त मिळाला नाही. मुरबाड पंचायत समितीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय सेक्युलर, या विविध पक्षासह अनेक सामाजिक कार्यकत्यार्र्ंनी आमसभेची मागणी केली. पण सर्वांच्या मागणीला पंचायत समितीने केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे.