संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

मुरबाडच्या ३५ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला होणार मतदान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुरबाड – राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १६६६ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका घेण्याचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच जाहीर केला आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या ३५ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोंबर रोजी मतदान आणि १४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. मात्र पितृपक्ष असल्याने आतापर्यत संपूर्ण तालुक्यात दोन उमेदवारांनीच आपले अर्ज दाखल केले आहेत.
मुरबाडच्या या ३५ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ४० हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. मात्र आतापर्यंत फक्त भोरांडे ग्रामपंचायतीसाठी दोन अर्ज दाखल झाले आहे. पितृपक्ष असल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरणे पुढे ढकलले आहे.एकट्या धसई ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ सदस्य तर अन्य ग्रामपंचायतीसाठी ९ किंवा ७ सदस्य निवडले जाणार आहेत.या तालुक्यातील निवडणुकीसाठी १८ अधिकाऱ्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami