संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीसांना आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पैठण- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी शासनाचा अजब आदेश समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेला हजर राहण्याबाबत शासकीय आदेशात म्हटले आहे. शासनाने ४२ गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय आदेशाची नोटीस बजावली आहे.या शासकीय आदेशावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी थेट शासकीय आदेशच जारी केला आहे. १२ तारखेच्या पैठण येथील सभेला सकाळी १० वाजता हजर राहा, असे या शासकीय आदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदनीसांनी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तब्बल ४२ गावातील अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनीसांना शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. शासनाने शासकीय सुट्टी नसताना कामकाज सोडून सभेला येण्याची नोटीस बजावली आहे. यावरून शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘अमक्याचे लग्न अन तमकेच वऱ्हाडी! गतवेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ओढावला होता. आता तशी फजिती नको म्हणूनच की काय तालुक्यातील अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बोलावण्यात येत आहेत, आता या बिचाऱ्या महिला चिखल तुडवत आपले काम सोडून पैठणला येतील. असे रिकामे उद्योग या भगिनींना सांगण्यापेक्षा त्यांचे मानधन वेळेत मिळेल याकडे जास्त लक्ष देण्याची गरज या सरकारला वाटत नाही. विशेष म्हणजे या सभेला येणाऱ्या इतरांसाठी विशेष ‘रोख पॅकेज’ची व्यवस्था करण्यात आली आहे, अशा शब्दात दानवे यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami