संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनंतर पालक मंत्र्यांसाठी ‘आनंदाचा शिधा’ रखडला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पैठण- सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत १०० रुपयांत “आनंदाचा शिधा’ किट देण्याची घोषणा केली. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला. मात्र सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळे तर आता चक्क पालक मंत्र्यांच्या फोटोसाठी त्याला उशीर झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे दिवाळीत गोरगरिबांना दिलासा मिळण्याऐवजी मनस्तापच मिळाला. पैठणचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आपल्या फोटोसाठी “आनंदाचा शिधा’ वाटप ४ दिवस उशिराने केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी केला आहे.
वाढत्या महागाईत गोरगरिबांची दिवाळी चांगली व्हावी या चांगल्या हेतूने राज्य सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा किट वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यात रवा, साखर, गोडेतेल आणि चणाडाळ या वस्तू दिल्या जात आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंमुळे आनंदाचा शिधा किटला विलंब झाला. त्यानंतर पैठणचे पालकमंत्री भुमरे यांनी कीटवर आपलाही फोटो हवा, असा हट्ट धरल्यामुळे पैठणमध्ये हे किट ४ दिवस उशिराने वाटप झाले. विशेष म्हणजे राज्यात अन्य ठिकाणी वाटप झालेल्या आनंदाचा शिधा किटच्या पाकिटावर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तिघांचेच फोटो आहेत. फक्त पैठणमधील कीटवर भुमरे यांचा फोटो आहे. विशेष म्हणजे किटवर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांचाही फोटो नाही. आनंदाचा शिधा पाकीटवर फोटो असलेले संदिपान भुमरे हे एकमेव पालकमंत्री आहेत. या सर्व प्रकारामुळे विरोधकांनी भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami