संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

मुकेश अंबानी सुरक्षा; हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या सुरक्षेसंबंधी त्रिपुरा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने आज स्थगिती दिली. कोणत्या कारणावरून मुंबई पोलिसांनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले त्याची माहिती द्या, असा आदेश त्रिपुरा हायकोर्टाने केंद्र सरकारला दिला होता. त्याला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जे. पी. पादरीवाला यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. अंबानी, त्यांची पत्नी आणि मुलांचाही त्यात समावेश आहे. तेव्हा कोणत्या कारणास्तव आणि कशाच्या आधारावर त्यांना ही सुरक्षा दिली. त्याच्या माहितीची मूळ फाईल सादर करा असा अंतरिम आदेश त्रिपुरा हायकोर्टाने गृहमंत्रालयाला २१ जूनला दिला होता. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टाला केली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. विकास साहा याने त्रिपुरा हायकोर्टात मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या संरक्षणाविषयी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर ३१ मे आणि २१ जून रोजी न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami