पुणे- पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 7 जानेवारी 2023 दरम्यान पार पडणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेसाठी भारताचा अव्वल मानांकित खेळाडू मुकुंद शशीकुमार याला वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देताना स्पर्धेच्या संयोजकांनी पुरुष एकेरीत भारताच्या प्रतिनिधित्वाची खात्री केली. चेन्नई येथील 25 वर्षीय शशीकुमार हा या स्पर्धेतील पहिला वाईल्ड कार्ड धारक ठरला असून अत्यंत खडतर अशा एकेरी ड्रॉ मध्ये माजी ग्रँड स्लॅम विजेता मरीन चिलीच व गतवर्षीच्या उपविजेता एमिल रुसुव्होरी यांच्यासह जगातील अव्वल मधील 17 खेळाडूंचा समावेश आहे.