संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

“मुइफा’ चक्रीवादळाचा चीनला तडाखा तुफान पाऊस! १० लाख जणांचे रेस्कू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीजिंग – “मुइफा’ चक्रीवादळामुळे चीनमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. शांघाईसह अनेक शहरे जलमय झाली आहेत. रस्त्यांना नदी-नाल्याचे रूप आले आहे. महापुरात पूल आणि गावे बुडाली आहेत. १० लाख लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पूरामुळे शांघाय आणि परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
चक्रीवादळामुळे बुधवारी चीनच्या किनारपट्टीत ताशी १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्याबरोबर जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे दक्षिण शांघाईतील निंगबो शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक स्कूटर आणि मोटारी बुडाल्या. काही वाहने वाहून गेली. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला. त्यात अडकलेल्या सुमारे १० लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे मेट्रो सेवा बंद झाली. वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरे जलमय झाली. पावसाचे पाणी घरे आणि दुकानात घुसून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यांवरील काही वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. पावसामुळे जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. वादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami