मुंबई – सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने मुंबई विमानतळावर नुकतीच ऐतिहासिक धाड मारली.या धाडी ३२ कोटी रुपये किंमतीचे तब्बल ६१ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी ५ पुरुष आणि २ महिला अशा सातजणांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भातील पहिल्या कारवाईत सीमा शुल्क विभागाने चार भारतीय प्रवासी जर टांझानियामधून आले होते,त्यांच्याकडून ५३ किलो सोने जप्त करण्यात आले असून चार ही आरोपींना अटक करण्यात आली.आरोपी अतिशय हुशारीने सोन्याची तस्करी करत होते.आरोपींनी सोने कमरेच्या पट्ट्यात लपवून ठेवले होते.चौघांकडून २८.१७ कोटी रुपयांचे ५३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.दोहा विमानतळावर सुदानी नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने हे सोने आरोपीला दिले होते.चौघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दुसऱ्या कारवाईत तीन प्रवाशांकडून ३.८८ कोटी रुपयांचे ८ किलो सोने जप्त केले आहे. हे आरोपी दुबईहून विस्तारा कंपनीच्या विमानाने आले होते. त्याने आपल्या जीन्समध्ये मेणाच्या स्वरूपात सोन लपवले होते.तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.