मुंबई : मुंबई विमानतळाचे आज अचानकपणे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या सर्व्हर क्रॅशमुळे विमान उड्डाणासाठी उशीर झाला.विशेष म्हणजे हा सर्व्हर किती वेळात पूर्ववत होईल याबाबतची कोणतीही माहिती प्रवाशांना एअर इंडियामार्फत देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.