संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या !आता दिवाळीनंतर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता दिवाळीनंतर परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल,अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा १० ऑक्टोबरपासून सुरु होणार होत्या.आता त्या पुढे ढकलण्यात आल्या असून दिवाळीनंतरच या परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान,हे सत्र उशीरा सुरु झाल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली.त्यानुसार विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात आला. २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या परीक्षांच्या नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा,मानव्य विद्याशाखा,विज्ञान तसेच तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा अधिक परीक्षा होणार आहेत. या संदर्भात डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले की,२०२२ च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami