संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर हॅक नव्या ट्विटवर विश्वास ठेवू नका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. त्यामुळे त्यावर जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका. याबाबत लवकरच सूचना दिली जाईल. त्यानंतरच रेल्वे पोलिसांच्या ट्विटकडे लक्ष द्या, असे आवाहन रेल्वे पोलिस आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.
काही दिवसांपासून देशात सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. हॅकर्स प्रसिद्ध व्यक्ती आणि संस्थांचे ट्विटर व फेसबुकला टार्गेट करत आहेत. सायबर गुन्हेगारीच्या या वाढत्या घटना रोखण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा सज्ज आहेत. रेल्वे पोलिसांचे हॅक झालेले ट्विटर पुन्हा पूर्वत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत या ट्विटरवरून होणाऱ्या नव्या ट्विटवर विश्वास ठेवू नये. ट्विटर अकाउंट पुन्हा सुरळीत झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. तोपर्यंत आपले प्रश्न आणि तक्रारी रेल्वे पोलिसांच्या ई-मेल किंवा १५१२ या क्रमांकावर कळवू शकता, असे रेल्वे त्यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami