संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

मुंबई महापालिकेने दिवसभरात 354 किलो प्लास्टिक केले जप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई महापालिकेने एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी आणण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार काल शुक्रवारी 1 जुलैपासून महानगरपालिकेने प्लास्टिकविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेकडून काल दिवसभरात 354 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महापालिकेची मॉलसह बाजारपेठा, दुकाने, फेरीवाले यावर करडी नजर असणार आहेत.
मुंबई पालिकेच्या बाजार विभाग, लायसन्स विभाग, आस्थापना आदी विभागांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयानुसार उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास महानगरपालिकेकडून 35 हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 अन्वये ही कारवाई केली जात आहे. दंड नाकारणार्‍याविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami