खोपोली- ट्रक चालकाला लागलेल्या डुलकीने घात केला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ दोन ट्रकची टक्कर होऊन अपघात झाला. त्यात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला. आज पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला.
चेन्नई येथून मुंबईकडे जात असलेला ट्रक आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळ आला तेव्हा ट्रक चालकाला डुलकी लागली. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. ती इतकी जबरदस्त होती की त्यात या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.