संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आज सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळपासून वाहतूक कोंडी झाली. बोरघाटात जवळपास 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दिवाळीचा पहिला दिवस, उद्या आणि परवा असलेले शनिवार, रविवार असे सुट्टीचे दिवस आणि त्यालाच जोडून येणारी दिवाळीमुळे गावाकडे जाणाऱ्या नागरिक संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्या घराबाहेर पडले आहे. परिणामी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. बोरघाटात जवळपास 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोशल मीडियावर या वाहतूक कोंडीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami