मुंबई- मुंबई महापालिका शाळांमधील सर्व भाषिक प्राथमिक शिक्षकांच्या तात्पुरत्या समायोजनाला अखेर तीव वर्षाच्या लढ्यानंतर ब्रेक मिळाला आहे. कारण राज्याच्या शिक्षण विभागाने २७१ सर्व भाषिक प्राथमिक शिक्षकांचे १ डिसेंबरपासून वेतनासह समायोजन करण्याचे आदेश आहेत.त्यामुळे पालिकेतील या शिक्षकांना त्याचा लाभ मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक सभा आणि अन्य संघटना वेतनासह समायोजन करण्याच्या मागणीसाठी सातत्याने लढा देत आहेत.अखेर या संघटनाची धडपड थांबली आहे.आतापर्यत मुंबई पालिकेतील शिक्षकांचे विविध शाळांमध्ये तात्पुरते समायोजन केले जात होते.त्यामुळे त्यांच्यावर सतत बदलीची टांगती तलवार लटकत होती.तीन वर्षे एका विभागातून बदली झाल्यानंतर पुढे कुठे बदली होईल हे सांगता येत नव्हते.मात्र १ डिसेंबर पासून या शिक्षकांचे वेतनासह समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे त्यांची तात्पुरत्या समायोजनेतून सुटका झाली आहे.