संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था
अजित पवारांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई- नाशिक महामार्गावरील समस्यांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गाची दुरुस्ती तात्काळ करून वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवते. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील समस्यांबाबत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई-नाशिक महामार्ग हा राज्यातला महत्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यापासून या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गावर होणार्‍या वाहतुक कोंडीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. खड्डे बुजवणे, रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे, याशिवाय अपूर्ण काम युद्धपातळीवर करणे, अवजड वाहनांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीवरही मार्ग काढणे अशा तक्रारी या पत्रात केल्या आहेत. शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूक संघटना, प्रवासी संघटना आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन नाशिक महामार्गाचे काम करण्याचे आव्हान शिंदे सरकारसमोर आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami