संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

मुंबई, ठाण्यात आज मुसळधारपावसाचा हवामान विभागाचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाऊस थांबण्याची शक्यता नाही. उद्या सोमवारपासून मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. असे असताना हवामान विभागाने पावसाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. १२ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल. पुढील चार-पाच दिवस तो कायम राहील. मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस पडेल. याशिवाय कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी रात्रीपासून पुण्यात पाऊस पडत आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami