संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस! गणेशभक्तांची तारांबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई, ठाणे, कल्याण सह कोकणात मध्ये आज जोरदार पाऊस पडण्यास आज साध्य्काल पासून सुरुवात झाली. मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ढगांच्या गडगट, वादळी वारे, विजांसह राज्यातील काही पाऊस पडला.पुढचे दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान खात्याने राज्यातील विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. काही भाग वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये बुधवारी ढगफुटीसदृष्य पाऊस पडला. अनेक गावांमध्ये ओढय़ा नाल्यांना पूर आला आहे. नीरा बारामती रस्त्यावरील अनेक पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेली असून वाहतूक ठप्प झाली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. दरम्यान नीरा बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी ट्रॅक्टरवर दोरीच्या साहाय्याने वाचवले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami