मुंबई- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने होणारी ६५ वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा डिसेंबर अखेर अहमदनगर येथे पार पडणार आहे.या स्पर्धेकरिता मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी उद्या शुक्रवार ९ डिसेंबर रोजी कुर्ला (पश्चिम ) येथील अंबिका सेवा मंडळ मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी स्पर्धेतील कुस्तीगिरांची वजने दुपारी ठीक २ वाजता सुरू होतील.या स्पर्धेत ५७, ६१,६५,७०,८६,९२,९७ आणि महाराष्ट्र केसरी गट ८६ ते १२५ किलो वजनगटात होणार आहे. तरी खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना आधारकार्ड व त्याची छायांकित प्रत सोबत आणावी.अधिक माहितीसाठी संपर्क अध्यक्ष संपत साळुंखे,सरचिटणीस, विनायकराव गाढवे, खजिनदार सतीश कदम यांच्याशी संपर्क साधावा.तरी
उपनगरातील जास्तीत जास्त पैलवानांनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व शिव छत्रपती पारितोषिक विजेता पै.संपतराव साळुंखे यांनी केले आहे.