संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

मुंबई आणि नाशिकमध्ये सीबीआयची छापेमारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – तब्बल 34 हजार 615 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचला. सीबीआयने मुंबई आणि नाशिकमध्ये अजय नावंदर आणि रिबेका देवाण या व्यक्तीच्या घरावर छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली.नावंदर हा छोटा शकीलचा अत्यंत जवळचा साथीदार आहे. या घोटाळ्यातील काही पैसा हा त्यांच्या माध्यमातूनही फिरवण्यात आल्याचा सीबीआयला संशय आहे.
डीएचएफएल कंपनीचे संचालक वाधवानांचे अंडरवर्ल्डशी कथित संबंध असल्याची ही दुसरी घटना असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी अन्य एका प्रकरणात डीएचएफएलच्या वाधवान बंधूंनी दाऊद गँगचा सदस्य असलेल्या इक्बाल मिर्ची याच्यासोबत काही आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल असून ईडीचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने मुंबई आणि महाबळेश्वर येथील देवाण बंगला अशा दोन ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये अजय नावंदर आणि रिबेका देवाण या दोघांच्या घरावर ही छापेमारी केली. विशेष म्हणजे या छापेमारीदरम्यान तब्बल 55 कोटी रुपयांची अत्यंत नामांकित चित्रकारांची चित्रे तसेच काही मूर्ती सापडल्या. सीबीआयने हे सारे ताब्यात घेतले आहे. बँक घोटाळ्यानंतर मिळालेला पैसा वाधवान आणि अन्य लोकांनी अनेक ठिकाणी फिरवला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami