संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 26 March 2023

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात! चौघांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू परिसरात कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात कारमधील सर्वच्या सर्व चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

या अपघातातील मृतांची नावे मोहम्मद अब्दुल सलाम हाफिसजी (३६), इब्राहिम दाऊद (६०) आसिया बेन कलेक्टर (५७) इस्माईल महंमद देसाय (४२) अशी आहेत. ही घटना डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती बसला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार गुजरातहून मुंबईच्या दिशेने चालली होती.हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृत प्रवासी हे गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे आहेत. बसमधील तीन प्रवासी अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सर्व मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात नेले. अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र नंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या