संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

मुंबईसह कोकण, गोव्यात
मुसळधार पावसाची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईसह परिसरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु होती. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचले होते. तसेच, पाणी साचल्यामुळे अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आता पुढील दोन दिवस मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाळकेश्वर, मलबार हिल, माटुंगा, सायन, दादर, लालबाग, परळ, भायखळा या भागात चांगला पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवाही कोलमडली होती. याचा नाहक फटका प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami