संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मुंबईत विसर्जनावेळी पाण्यात तरंगणाऱ्या दुर्गा देवीचे फोटो काढण्यावर बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई शहरात यंदा दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान पाण्यात तरंगणाऱ्या किंवा अर्ध्या बुडलेल्या दुर्गा देवीच्या मूर्तीचे फोटो काढता येत नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येत नाहीत. या संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी करताना मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, दुर्गा देवीच्या मूर्ती पाण्यात तरंगताना किंवा अर्ध्या पाण्यात बुडलेल्या दृश्‍यांमुळे धार्मिक भावना दुखावू शकतात.त्यामुळे अशा मुर्त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त (कार्यक्रम) संजय लाटकर यांनी काढलेल्या आदेशानुसार ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. अर्ध्या बुडलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर येतात किंवा तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसतात.काही लोक ज्या मूर्ती किनाऱ्यावर येतात किंवा पालिकेचे कामगार पुन्हा विसर्जनासाठी घेऊन जात असतात अशा मुर्त्यांचे फोटो, व्हिडिओ काढतात. ही गोष्ट प्रकाशित किंवा प्रसारित झाल्याने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात व त्यामुळे शांतता भंग होऊ शकते. म्हणून यंदा असा मुर्त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami