संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मुंबईत रेल्वे स्थानकावर मिळणार आता
हवेतून पाणी! ‘मेघदूत” मशीन बसवणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई रेल्वे स्टेशनवर वाढती प्रवाशांची संख्या आणि त्यांना मुलभूत सोई-सुविधा मिळवून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न राहिलेला आहे. आता प्रवाशांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने एक अनोखा फंडा राबवला जाणार आहे.मध्य रेल्वे स्थानकावर हवेतून पाणी तयार करणारे मेघदूत नावाचे यंत्र बसवले जाणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे.मुंबईतील पाच रेल्वे स्टेशनवर हे यंत्र बसवले जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
मान्सूनच्या काळात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस असला तरी मुंबईकरासाठी पाणी टंचाई ही नवीन नाही. शिवाय पाणीकपातीला हा सामोरे जावे लागते.अशी प्रतिकूल स्थिती असतनाच प्रवाशांना किमान रेल्वे स्टेशनवर तरी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक असे यंत्र बसवले जाणार आहे, जे हवेतून पाणी तयार करेल. अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकात हे मेघदूत नावाचे यंत्र बसवले जाणार आहे. तर इतर पाच रेल्वे स्टेशनमध्येही हे यंत्र असणार आहे. या मेघदूत यंत्राच्या माध्यमातून हवेतून पाणी निर्माण होणार आहे. सांद्रीभवन शास्त्राचा वापर करुनच हे यंत्र बाहेरील हवेतून पाणी काढणार आहे. या अत्याधुनिक उपकरणाला एडब्ल्यूजी असेही म्हणतात. एवढेच नाहीतर या उपकरणाला संयुक्त राष्ट्राने देखील मान्यता दिलेली आहे. मुंबईतील ठाणे आणि दादर येथेही ही उपकरणे बसवली जाणार आहेतच पण कुर्ला,घाटकोपर येथे प्रत्येकी एक तर ठाण्यात ४ उपकरणे बसवली जाणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami